मंडळाचे कामकाज
- राज्य शासनाकडून माथाडी कामगार, त्यांना नियुक्त करणारे मालक तसेच राज्य शासन यांचे प्रतिनिधी समाविष्ट असलेले त्रिपक्षीय (प्रातिनिधिक) मंडळ गठित करण्यात येते. सदर मंडळ गठित होईपर्यंत एक सदस्यीय मंडळाचीही स्थापना करण्यात येते.
- मंडळांच्या माध्यमातून कामगारांना पुरेसे वेतन, नियमित व स्थिर रोजगार, पगारी रजा, भविष्य निर्वाह निधी, उपदान तसेच इतर सुविधा व लाभ मिळावेत, याबाबत निर्णय घेतले जातात.
- या अधिनियमामुळे प्रचलित कामगार कायद्यांच्या व्याख्येत न बसणाऱ्या माथाडी कामगारांसारख्या असंघटित कामगारांनाही सामाजिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे.
- बहुतेक माथाडी कामगार हे एकत्रितपणे काम करतात, ज्याला टोळी असे म्हणतात. एका टोळीत किमान 2 ते कमाल 300 पर्यंत कामगार असू शकतात. टोळीच्या प्रमुखाला मुकादम असे म्हणतात.
- सर्वसाधारणपणे माथाडी कामगार हे तुकड्याप्रमाणे (पीस-रेट) काम करून मजुरी घेतात. दरमहा मिळणारी मजुरी व मंडळाची लेव्ही ही नोंदणीकृत मालकांकडून थेट माथाडी मंडळात जमा करण्यात येते. त्यानंतर लेव्ही वगळून उर्वरित वेतनाची रक्कम टोळीतील कामगारांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.
- नोंदणीकृत मालक व कामगार यांच्यातील वादात मध्यस्थी करून समेट घडवून आणण्याचे काम मंडळ करते.