नवीन मालक व माथाडी कामगारांची नोंदणी
- मंडळ योजनेच्या खंड १४ नुसार, ज्या भागात मंडळाची योजना लागू आहे त्या भागातील मालकाने संबंधित माथाडी मंडळात नोंदणीकृत होणे बंधनकारक आहे.तसेच मंडळाच्या कार्यक्षेत्रात माथाडी स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी खंड १५ नुसार करणे आवश्यक आहे.
- एखाद्या आस्थापनेत माथाडी स्वरूपाचे काम सुरू असल्याचे आढळून आल्यास, मंडळाचे निरीक्षक त्या ठिकाणी भेट देऊन काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या मुलाखती घेतात आणि संबंधित आस्थापना मालकास नोंदणीबाबत निरीक्षण अहवाल (शेरे पान) सादर करतात.
- त्यानंतर मालकाचा नोंदणी अर्ज व त्या आस्थापनेतील कामगारांचे नोंदणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर, निरीक्षकामार्फत त्यांची छाननी करण्यात येते.
- मालकाच्या अर्जासोबत विहित रकमेचा धनादेश मंडळाच्या नावे सादर करण्यात आला आहे की नाही, याची खात्री केली जाते.तसेच सदर मालकाची आस्थापना दुकाने व आस्थापना अधिनियम, कारखाने अधिनियम किंवा मोटार वाहन अधिनियम यांपैकी किमान एका अधिनियमानुसार नोंदणीकृत आहे की नाही, याची तपासणी केली जाते.
- कामगारांच्या नोंदणी अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला व पोलीस पडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे की नाही, याची खात्री केली जाते.
- सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालक व कामगारांची अधिकृत नोंदणी करण्यात येते.
- मालकाकडून नोंदणी शुल्क म्हणून रुपये २५/- ते ५००/- पर्यंतचा धनादेश स्वीकारून पावती देण्यात येते. तसेच कामगारांकडून नोंदणी शुल्क म्हणून रुपये १/- ते २५/- स्वीकारून मालक व कामगारांची मंडळात नोंदणी केली जाते.
- नोंदणीकृत कामगारांना टोळी क्रमांक देण्यात येतो आणि त्यांना संबंधित नोंदणीकृत मालकाकडे कामासाठी नियुक्त करण्यात येते.