उद्दिष्टे
माथाडी कामगारांना नोकरीच्या सेवाशर्तींबाबत संरक्षण व सुविधा उपलब्ध करून देणे हे या अधिनियमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये कामाचे तास, वेतन, बोनस, पगारी रजा तसेच भविष्य निर्वाह निधी, उपदान, अपघात नुकसानभरपाई यांसारख्या सामाजिक सुरक्षिततेच्या सुविधा व इतर लाभांचा समावेश आहे.
तसेच कामगारांचा पुरेसा व नियमित पुरवठा सुनिश्चित करून त्यांच्या श्रमशक्तीचा पूर्ण उपयोग व्हावा, या उद्देशाने माथाडी मंडळाची स्थापना करणे हे देखील माथाडी अधिनियमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
सदर अधिनियमाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर लागू आहे.