माथाडी मंडळाबद्दल
महाराष्ट्रातील हमाल, माथाडी व अंगमेहनतीने माल चढवणे-उतार करणे, मालाची रचना करणे, मालाची ने-आण करणे, वजन व मापन करणे, वर्गीकरण, पृथक्करण, स्वच्छता इत्यादी कामे करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी शासनाने महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ अंतर्गत कलम ६ नुसार माथाडी मंडळांची स्थापना केली आहे.
या अधिनियमांतर्गत राज्यात एकूण ३६ माथाडी मंडळे स्थापन करण्यात आलेली असून, ही मंडळे एक किंवा अधिक जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रासाठी कार्यरत आहेत.
मुंबईमध्ये मालाच्या वर्गीकरणानुसार सध्या ११ मंडळे कार्यरत आहेत. त्यापैकी १० मंडळांचे कार्यक्षेत्र मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांमध्ये आहे. उर्वरित १ मंडळ हे महाराष्ट्र मत्स्यमार उद्योगातील मत्स्यमार व इतर श्रमजीवी कामगारांसाठी असून, त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे.
उर्वरित ३१ जिल्ह्यांमध्ये एकूण २५ माथाडी मंडळे कार्यरत आहेत.
प्रत्येक माथाडी मंडळाची स्वतःची स्वतंत्र योजना आहे.