लेव्हीची आकारणी व विभागणी
- कामगाराने केलेल्या कामाच्या मजुरीवर मंडळाने ठरविलेल्या दरानुसार लेव्हीची आकारणी केली जाते. ही लेव्ही किमान ३०% ते कमाल ४५% इतकी असते.
- योजनेनुसार, कामगाराने काम केलेल्या मजुरीची रक्कम लेव्हीसह मालकाकडून धनादेशाद्वारे मंडळाकडे जमा केली जाते.
- तसेच योजना राबविण्याच्या प्रशासकीय खर्चासाठी, मालक मंडळाच्या लेव्ही दरानुसार किमान ३% ते ५% इतकी अतिरिक्त रक्कम मंडळाकडे जमा करतो.
- प्राप्त झालेल्या लेव्हीची रक्कम मंडळाने ठरविलेल्या प्रमाणानुसार विविध कल्याणकारी योजनांसाठी विभागली जाते. यामध्ये भविष्य निर्वाह निधी, उपदान, बोनस, घरभाडे भत्ता, रजा प्रवास भत्ता, भरपगारी रजा, अपघात नुकसान भरपाई इत्यादींचा समावेश असून ही रक्कम कामगारांच्या खात्यांमध्ये जमा केली जाते.
- यापैकी:
- बोनसचे वाटप कामगारांना दिवाळीपूर्वी केले जाते.
- घरभाडे भत्ता, रजा प्रवास भत्ता व भरपगारी रजा यांचे एकत्रित वाटप मे महिन्यात करण्यात येते.
- भविष्य निर्वाह निधी व उपदान हे कामगाराने राजीनामा दिल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर देण्यात येते.
- कामगारास अपघात झाल्यास, त्याच्या कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार, श्रमिक अपघात नुकसान भरपाई अधिनियमानुसार आकारणी करून, माथाडी अधिनियमाच्या कलम १८ नुसार अपघात नुकसान भरपाई अदा करण्यात येते.
- उदाहरणार्थ, किराणा बाजार व दुकाने मंडळ, मुंबई या मंडळातील लेव्हीची विभागणी पुढीलप्रमाणे आहे:
अ.क्र. | घटक | टक्केवारी |
|---|---|---|
१ | भविष्य निर्वाह निधी | १०.००% |
२ | उपदान | ०३.६७% |
३ | दिवाळी बोहणी (बोनस) | १४.५०% |
४ | रजेचा पगार | ०४.५०% |
५ | भरपगारी रजा | ०१.००% |
६ | घरभाडे भत्ता | ०२.००% |
७ | प्रशासकीय खर्च | ०२.२१% |
८ | रजेच्या काळातील प्रवास भत्ता | ००.६२% |
९ | अपघात नुकसान भरपाई | ००.५०% |
१० | वैद्यकीय सेवा | ०२.००% |
एकूण | ४१.००% |