महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कलम 18 (1) नुसार प्रत्येक राज्याने त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे. 

बांधकाम व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठया असंघटित वर्गात येतात . कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशानें तसेच सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने , भारत सरकारने “इमारत व इतर बांधकाम कामगार”(रोजगार व सेवाशर्ती नियमन ) कायदा १९९६ ची तरतूद केली आहे.या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार” (रोजगार व सेवा शर्तीचे नियमन) २००७ देखील मंजूर केले.

ह्या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनानेसुद्धा “महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार ( रोजगार व सेवाशर्ती नियमन ) अधिनियम ” पारित केला. ह्या अधिसूचनेनुसार सुरवातीस महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना ५ शासन प्रतिनिधी नेमून करण्यात आली.

अधिनियम २०११ ,२०१५ व २०१८ नुसार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली व त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले. मंडळात अध्यक्ष तसेच शासन, मालक व कामगार ह्यांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी मंडळात घेण्यात घेण्यात आले.. 

नियम ३५ (१) नुसार मंडळाचा कार्यकाळ ३ वर्षाचा आहे.

मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.

अधिक जाणून घेण्यासाठी: जाण्यासाठी क्लिक करा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ वेबसाइट