माथाडी हॉस्पिटलची स्थापना

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 च्या कलम 6(1) अन्वये राज्यात विविध माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळांच्या योजनांनुसार माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माथाडी हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. माथाडी हॉस्पिटल (ट्रस्ट) हा माथाडी मंडळांचा एक कल्याणकारी प्रकल्प असून सदर संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत आहे.

स्वर्गीय आ. अण्णासाहेब पाटील यांनी डॉ. के. आर. तोरसकर यांच्यासारख्या समर्पित व जाणकार वैद्यक तज्ञाच्या सहकार्याने सन 1976 मध्ये मस्जिद परिसरात एक लहान दवाखाना सुरू केला. कालांतराने या दवाखान्याचे रूपांतर पॉलीक्लिनिकमध्ये झाले आणि पुढे ते एक लहान रुग्णालय म्हणून विकसित झाले. मस्जिद येथून बाजारवाडी परिसरात स्थलांतर झाल्यानंतर कोपरखैरणे येथे एका सुसज्ज 129 खाटांच्या रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली आहे. सदर संस्थेच्या एकूण दोन इमारती आहेत.